Pune News : दुचाकी चोरणार्‍याला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 4 दुचाकी जप्त केल्या आहेत.
गणेश मारुती पारखे (वय २६, सध्या रा. वाघजाईनगर, कात्रज, मूळ रा. खामवाडी, ता. कर्जत, जि. नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथक गस्त घालत होते. त्यावेळी दुचाकी चोरटा शेळके वस्ती परिसरात पारखे थांबला होता. संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी मी पारखेकडे दुचाकीची कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. चौकशीत त्याने बिबवेवाडी, मार्केटयार्ड, कोरेगाव पार्क भागातून सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सहाय्यक निरीक्षक राजेश उसगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे.