Pune News | दुर्देवी ! भरधाव PMPML बसच्या धडकेत 16 वर्षीय मुलीचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पीएमपीएमएल बसच्या (PMPML Bus) धडकेत सायकलवरून (Bicycle) जात असलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू (Death) झाला आहे. चंदा परमार (वय,16, रा. थोरवे चौक, दीप बंगला चौकाजवळ, मॉडेल कॉलनी) असं त्या मृत अल्पवयीन मुलीचं नाव आहे. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास मॉडेल कॉलनीतील दीप बंगला चौकानजदीक (शिवाजीनगर-Shivajinagar, Pune) येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चंदा परमार (Chanda Parmar) हि तिच्या सायकलवरून शनिवारी दुपारी 1 वाजता दीप बंगला चौकाजवळच्या थोरवे चौकातुन डिएसके शो रूमसमोरील रस्त्याने जात होती. त्यावेळी गोखले नगर-पुणे स्टेशन या मार्गावरील ‘पीएमपीएमएल’ बस (MH. 12.FZ, 8320) हि शिवाजीनगरकडे जात होती. त्यावेळी चंदाला बसच्यामधील भागाचा धक्का बसल्याने ती दुभाजकावर (Divider) आदळली.

त्यावेळी तिच्या कमरेला जबर मार लागल्याने. गंभीर दुखापत झाली.अशाच अवस्थेतच चंदाला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथून तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. ससून रुग्णालयात उपचाराअंती सायंकाळी तिचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पीआय अनिता मोरे (Senior PI Anita More) यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला.

हे देखील वाचा

Upcoming IPOs | सप्टेंबरमध्ये येताहेत आणखी 2 कमाईच्या संधी, जाणून घ्या किती रुपयांची करावी लागेल गुंतवणूक?

Gold Price Today | आज ‘स्वत’ झाले सोने-चांदी, जाणून घ्या किती घसरण झाली किमतीत?

Earn Money | केवळ एक एकरच्या शेतीत 6 लाख रुपयांची करा कमाई, सरकार सुद्धा करेल मदत; जाणून घ्या

Ajit Pawar | बारामती दौऱ्यावर असताना अजितदादांनी घेतली चक्क इलेक्ट्रीक रिक्षाची ट्रायल (व्हिडीओ)

CBSE ने बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये केला मोठा बदल, यावर्षी दोन टप्प्यात होईल परीक्षा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Unfortunate! 16-year-old girl killed in Bhardhav PMPML bus collision

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update