Pune News : पुण्यात 99 बुथवरुन 16 ठिकाणी लसीकरण होणार : मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. आशीष भारती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्या मध्ये 16 जानेवारी रोजी लसीकरण सुरु होणार असून प्रथय सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी, स्टाफ व अधिकारी यांना लसीकरण करण्यात येनार असून पुण्या मध्ये 99 बुथ वरुन 16 ठिकाणी लसीकरण केले जानार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिके चे आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली.

अधिक माहिती देताना डॉ. आशिष भारती म्हणाले कि, आता पर्यंत 52 हजार रजिस्ट्रेशन झाले आहे. मुबलक प्रमाण लस उपलब्ध झाल्यावर हे लसीकरण 8 दिवसात पूर्ण होईल. हे लसीकरण राज्य सरकारच्या मार्गदर्शन सूचना चे पालध करुन होणार आहे. एका दिवसाला 100 लोकांना लसीकरण करण्यात येनार आहे. रजिस्ट्रेशन केलेल्या सर्वांना मेसेज द्वारे बोलवले जाईल. यासाठी पुणे परिसरात ढोले पाटील रोड, नगर रोड, वारजे, सिंहगड रोड, वानवडी, कोंढवा, हडपसर, बिबवेवाडी, भवानी पेठ, शिवाजी नगर, विश्रांतवाडी आदी ठिकाणी हे बुथ उभारण्यात आले आहेत. या बुथ द्वारे सरकारी व खासगी दोन्ही हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येनार आहे. या मध्ये सरकारी 11,222 हॉस्पिटल व 41888 खासगी हॉस्पिटल चा समावेश आहे. या लसीकरणासाठी जंबो हॉस्पिटल चा सध्या विचार नाही. तरी भविष्यात लसीकरणाचा आकडा वाढल्यास जंबो हॉस्पिटल मध्ये लसीकरण केले जाईल.