Pune News : आयडियल एज्युकेशनमध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकरी, कामगार, युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला शिवरायांचे विचार अंगिकारण्याची गरज आहे. कोरोनाचा ज्वर कमी झाला होता. मात्र, मागिल चार-पाच दिवसांपासून वाढत आहे, त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे मत मराठा सेवा संघाचे पुणे शहर अध्यक्ष सचिन आडेकर यांनी व्यक्त केले.

मराठा सेवा संघ पुणे, हडपसर ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि कार्तिकेय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्द्यमाने शिवजन्मोत्सव 2021 अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मराठा संघाचे राजेंद्र कुंजीर, मारुती सातपुते, हडपसर काँग्रेसचे रमेश राऊत, रमेश पंडित, धर्मराज मेहेत्रे सर, डॉ. अबोली इनामदार, मुख्याध्यापक सुनील भालके, जाकीर शेख, अकबर शेख उपस्थित होते.

हडपसर येथील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या अल-जदिद उर्दु प्रायमरी व हायस्कूल येथे “छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत 467 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेतील विजेते :
शुद्ध व सुंदर लेखन मध्यम गट – फौकीया शेख, अल्फीया शेख, मुस्कान शेख,
वरिष्ठ गट – इरम अन्सारी, खान सिद्रा, सफा रहीम मोअज्जन, फातिमा शेख व साबीर अहमद यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे कार्याध्यक्ष फहीम इनामदार यांनी केले. हडपसर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रा. शोएब इनामदार यांनी प्रास्ताविक केले. शिवव्याख्याते इमरान शेख यांनी सूत्रसंचालन केले. देवदास लोणकर यांनी आभार मानले.