×
Homeताज्या बातम्याPune News | धक्कादायक ! पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए...

Pune News | धक्कादायक ! पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Popular Front of India (PFI) | पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Pune Collector Office) काही युवकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ (Pakistan Zindabad Slogan) आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे (Pune News). शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील अल्पसंख्यांक समुदायामधील (Minority Communities) काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केलेल्या कारवाईविरोधात घोषणाबाजी केली. (Pune News)

पीएफआय विरोधात एनआयएने केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांना पुणे पोलिसांनी (Pune Police) कुणकुण लागताच आंदोलन (Agitation) सुरु होण्यापूर्वीच ताब्यात घेतले. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आले. अनेकांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवण्यात आले. (Pune News)

मात्र, यानंतर आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणा दिल्या. या घोषणाबाजीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी आंदोलकांनी ‘आरएसएस (RSS) मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली.

या घोषणाबाजी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रियाज सय्यद (Riyaz Syed) आणि 60 ते 70 पीएफआय
कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा
झाल्याचा उल्लेख पोलिसांनी केला आहे.
या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी अन्य काही व्यक्तींनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title :-  Pune News | video pakistan zindabad slogan allegedly raised in front of pune collector office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dasara Melava 2022  | शिवाजी पार्कवर ‘हसरा मेळावा’, भाजपने उडवली उद्धव ठाकरे यांची खिल्ली

BJP Amit Shah – NCP Eknath Khadse | अमित शाह – एकनाथ खडसे यांच्यात फोनवर चर्चा ! नाथाभाऊ NCP सोडून पुन्हा भाजपात जाणार का? चर्चेला उधाण

Pune Crime | विश्वास संपादन करुन 22 लाख रुपये चोरुन नेणार्‍या महाराजाला स्वारगेट पोलिसांकडून अटक

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News