Pune News | चिंचवडगावतील सुप्रसिद्ध नाना हस्ताक्षर वर्गाचे संचालक विजयकुमार मेंडजोगी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | चिंचवडगावतील सुप्रसिद्ध नाना हस्ताक्षर वर्गाचे संचालक विजयकुमार प्रल्हाद मेंडजोगी (वय ७२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे हस्ताक्षर सुधारणा विषयाचे पुस्तक सुप्रसिद्ध आहे, त्याशिवाय वर्तमानपत्रातून, सोशल मीडिया मधून त्यांचे विविध विषयांवरील लेख प्रसिद्ध होत (Pune News) असत. आकाशवाणी, दूरदर्शन तसेच विविध TV चॅनेल वर त्यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या होत्या. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, तीन नाती, एक नातू असा परिवार आहे.

हस्ताक्षर वर्गात शिकलेले विद्यार्थी, पालक व मित्र परिवार यांनी अचानक घडलेल्या दुःखद घटनेत एक लोकप्रिय व प्रेमळ व्यक्तिमत्व गमावल्याने हळहळ व्यक्त केली. विजयकुमार मेंडजोगी नाना हस्ताक्षर वर्ग संचालक. सर टाटा मोटर्स मध्ये जॉब करत असतानाच त्यांनी हस्ताक्षर सुधारणा वर्ग चालू केले. त्यामध्ये अर्थार्जन पेक्षाही, मुलाचं अक्षर सुधाराव ही तळमळ जास्त होती. 95/96 साली सुरू केलेल्या कलाससेस मध्ये साधारणपणे 2500 पेक्षाही जास्त विध्यार्थी ना मार्गदर्शन करून 25 तासात कोणाचे ही अक्षर सुधारू शकते हे सिद्ध करून दाखवले.

त्याच प्रमाणे कित्येक लोकांना हस्ताक्षर शिक्षक म्हणून तयार करून स्वतःच्या पायावर उभ केल.
त्यांनी तयार केलेले हस्ताक्षर शिक्षक पुणे , तसेच पिंपरी चिंचवड येथील नगरपालिकेचा शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
शिस्तप्रिय , प्रामाणिक, आणि तितकेच हळवे असे मेंडजोगी सर म्हणून त्याचा नावलौकिक होता.
त्यांनी केलेल्या कार्याची दखल पुणे आकाशवाणी, दूरदर्शनवर त्यांची मुलाखत प्रसारित केली.
तसेच अनेक पेपर मध्ये ही त्यांचे या संदर्भातील लेख वेळो वेळी प्रसिद्ध केलेत. त्यांच्या जाण्याने या म्हणजेच हस्ताक्षर या विषयातील सखोल ज्ञान असणारा माणूस गेल्यामुळे सर्व च समाज माध्यमातून हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा

PMC Recruitment 2021 | पुणे महापालिकेत ‘या’ 203 पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर

तुमचे सुद्धा Aadhaar-Pan Card लिंक नाही का?, जाणून घ्या काही मिनिटात कसे करावे लिंक?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Vijaykumar Mendjogi is no more

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update