Pune News : होळकर जलकेंद्रातून खडकीला पाणीपुरवठा करावा : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी पुण्यात येईल त्यावेळी त्यावेळी होळकर जलकेंद्रातून खडकीसाठी पाणी पुरवठा करावा अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

सध्या चतुःश्रृंगी जलकेंद्रातून खडकीला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, खडकीला पुरेसे पाणी मिळत नाही. यावर पर्याय म्हणून भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी पुण्यात येईल त्यावेळी होळकर जलकेंद्राःतून पाणी पुरवठा करावा. होळकर पंप ते खडकी पाणी टाकीपर्यंत पाईपलाईन टाकलेली आहे, फक्त एक जोडणी बाकी आहे. त्यामुळे खडकीच्या पाणीपुरवठ्यासाठी फारसा खर्चही येणार नाही, असे शिरोळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून चाळीस लाख रुपये खर्चून पाणी टाकी ते खडकी बाजार अशी नवीन पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आलेली आहे. हे पहाता भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी पुण्यात येईल तेव्हा खडकीच्याही पाणीपुरवठ्यात सुधारणा करता येईल, असे आमदार शिरोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.