Pune News : दक्षिण पुण्याच्या भागातील पाणीपुरवठा उद्या बंद

पुणे : पर्वती जलकेंद्रातील पाण्याच्या टाकीवरील देखभाल दुरुस्तीचे उद्या गुरुवारी (४ फे ब्रुवारी) करण्यात येणार आहे. त्यामुळे पद्मावती पंपिंगअंतर्गत शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या कालावधीत बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून त्याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग ः कोंढवा खुर्द-मीठानगर प्रभागातील साईबाबा नगर गल्ली क्रमांक १ ते १०, राजीव गांधी मुख्य रस्ता, चेतन गार्डन, ज्ञानेश्वर नगर, मल्लिक नगर, भाग्योदय नगर गल्ली क्रमांक १९ ते २५, कोंढवा गावठाण. सॅलसबरी पार्क-महर्षिनगर या प्रभागातील पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, संदेशनगर, एकोपा सोसायटी, दर्शनी चौक परिसर, शंकर सोसायटी, कुशल सोसायटी, न्यू एरा सोसायटी, सोपान महाराज सोसायटी, संत नामदेव शाळेमागील सोसायटी, गीत गोविंद सोसायटी, लालबाग सोासयटी, मधू-मंगेश सोसायटी, इंदिरानगर, गुलटेकडी औद्योगिक वसाहत, डायस प्लॉट, सहकारनगर-पद्माावती परिसरातील पूर्ण पद्माावती, तळजाई वसाहत, चव्हाणनगर, संभाजीनगर, तीन हत्ती चौक, पांचाळ वस्ती, मोरे वस्ती, मार्के ट यार्ड-लोअर इंदिरानगर प्रभागातील बिबेवाडी गावठाण, संत एकनाथ नगर, सोसायटी, भारत ज्योती सोसायटी, रम्यनगरी सोसायटी, गंगाधाम सोसायटी, वर्धमान पुरा सोसायटी, स्वयंभू सोसायटी, अपर-सुपर इंदिरानगर प्रभागातील दामोदर सोसायटी, महेश सोसायटी, वैभव सोसायटी, धर्मवीर पार्क, २७६ ओटा, गणेश विहार सोसायटी, विघ्नहर्ता रुग्णालयत, कॅ नरा बँक, वैभव सोसायटी, दुर्गामात गार्डन, सुवर्ण मीटर मंडळ, अपरमधील काही भागा, २७० ओटा, राजीव गांधी उद्यान-बालाजीनगर प्रभागातील पुण्याईनगर, अहिल्यादेवी चौक, सातारा रस्ता, चिंतामणी रुग्णालय परिसर, स्टेट बँक नगर परिसर, चैत्रबन सोसायटी, ओम-अलंकार सोसायटी, जयपूर गार्डन परिसर, मनमोहन पार्क परिसर, किमया सोसायटी, धनकवडी आणि आंबेगाव प्रभागातील गणेशनगर, कलानगर, दैलतनगर, कुंदननगर, संगतीनगर, रक्षालेखा, नित्यानंद सोसायटी, चैतन्यनगर, संभाजीनगर, मुंगळे अण्णा नगर या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.