Pune News | दत्तवाडी परिसरात पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल; हंडा मोर्चा काही दिवसांसाठी मागे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune News) दत्तवाडी आणि परिसरात कृत्रिम पाणी टंचाई केली जात असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि दत्तवाडी परिसरातील (Pune News) नागरिकांनी केला आहे. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pune NCP) चिटणीस अभिजित बारवकर (Abhijit Barwakar) आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पाणी पुरवठा विभागाचे (water supply department) मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Aniruddha Pawaskar) यांना निवदेन दिले.

दत्तवाडी (Dattawadi) व जवळील परिसरात कृत्रिम पाणी टंचाई केली जात असून नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे.
या आधी कधीही यापरिसरात टँकरने पाणीपुरवठा करायची वेळ आली नव्हती.
स्मार्ट पुणे (Smart Pune News) करत असताना आमचा परिसर देखील स्मार्ट करण्यास सुरुवात
करावी अन्यथा लवकरच महानगर पालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी पुढिल 2 ते 3 दिवसात दत्तवाडी व जवळील परिसरात पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल असे आश्वासन दिले.
तसेच पावसकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना काम सुरु करण्याचे आदेश दिले.
पावसकर यांनी सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे पुणे महानगरपालिकेवर जाणारा हंडा मोर्चा काही दिवसांसाठी मागे घेण्यात आला.

Web Title :- Pune News | Water supply will be restored in Dattawadi area; Handa Morcha back for a few days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाच्या अमिष दाखवून 25 वर्षाच्या तरुणीवर वडकी, लोणावळा, भेकराइनगर येथे नेऊन केला बलात्कार, गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरसह दोघांवर FIR

Pune Police Crime Branch | ज्लेलर्सच्या दुकानातून हातचलाखीने अंगठ्या चोरणारी ‘बबली’ गुन्हे शाखेच्या जाळ्यात

LPG Cylinder Subsidy | LPG सिलेंडरवर तुम्हाला पुन्हा मिळू शकते सबसिडी, सरकारने तयार केला ‘मास्टर’ प्लॅन