Pune News | काय सांगता ! होय, पुण्यातील 13 हजार 464 सोसायट्यांची जागा अद्यापही बिल्डरच्या नावावर; जाणून घ्या नेमकं?

पुणे : Pune News | पुणे शहरातील तब्बल १३ हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) Deemed Conveyance of a Co-operative Housing Society केलेले नाही. परिणामी या सोसायट्यांची जागा अद्यापही बिल्डरच्या (Builders In Pune) नावावर आहे. त्यामुळे संबंधित सोसायट्यांनी तातडीने डीम्ड कन्व्हेअन्स करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Pune News)

पुणे शहरात १९ हजार २९ नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यापैकी २१२५ संस्थांना डीम्ड कन्व्हेअन्स आवश्यक नाही. कन्व्हेअन्ससाठी केवळ ३६४१ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी ३४४० प्रस्तावावर कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित २०१ प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे पुण्यातील १३ हजार ४६४ सोसायट्यांचे अद्यापही मानीव अभिहस्तांतरण बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Pune News)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मानीव अभिहस्तांतरण प्रकरणाबाबत असलेल्या अडचणी सोडविण्याकरिता गठित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ही बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संस्थांनी संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यालयाकडे मानीव अभिहस्तांतरणाबाबतचा अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा. मानीव अभिहस्तांतरणासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या अतिशय कमी करण्यात आली असून सदनिकाधारकांनी आवश्यक कागदपत्रे संस्थेकडे उपलब्ध करून दिल्यास या प्रक्रियेला गती येईल. अपार्टमेंट डिड झालेल्या वैयक्तिक सदनिकाधारकांची नावे मालमत्ता पत्रकावर नोंद घेण्याबाबत सक्षम प्राधिकारी यांना सूचना देण्यात येत आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.

दरम्यान, नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने मानीव अभिहस्तांतरणाबाबत सहकार विभागाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत या प्रक्रियेला गती देण्यासाठी सहकार विभागाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तसेच याकामी नोंदणी विभागाची मदत घ्यावी. गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरणाबाबतची माहिती देण्यात यावी. मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया ही सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब असून गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरणाबाबत पाठपुरावा करून असे प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, असेही तेली यांनी सांगितले.

नोंदणी विभागाच्या वतीने मानीव हस्तांतरण १८२६ दस्त नोंदी झाल्या आहेत.
विकसकाने १४५७ संस्था अभिहस्तांतरण करून दिल्या आहेत.
प्रलंबित संस्थांचे मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार विभाग प्रयत्नशील आहे,
असे पुणे शहरचे जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव ( District Deputy Registrar Narayan Aghav)
यांनी बैठकीत सांगितले.

Web Title :-  Pune News | What do you say! Yes, 13 thousand 464 societies in Pune are still in the builder’s name; Know exactly?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन दिल्ली दौरा करणार, रुम्स देखील बुक केल्या

High Uric Acid च्या रूग्णांनी कधीही करू नयेत ‘या’ 5 चूका, अन्यथा वाढू शकतो त्रास