Pune News : पुणे शहरात काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याने शहरात काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण ? याची चर्चा काँग्रेस पक्षात सुरू झाली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षात् संघटनात्मक बदली करण्यात आले. प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाली. या बदलात पुणे शहर काँग्रेस पक्ष अध्यक्षही बदलले जातील असा अंदाज व्यक्त केला जात होता. विद्यमान शहराध्यक्ष रमेश बागवे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ति झाली, याचा अर्थ शहराध्यक्षपदावर नवीन नेमणूक केली जाणार हे स्पष्ट आहे. अध्यक्षपदासाठी अरविंद शिंदे, संजय बालगुडे, आबा बागुल, वीरेंद्र किराड, दत्ता बहिरट आदींची नांवे चर्चेत आहेत. येत्या वर्षभरात पुणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. या दृष्टीने नव्या अध्यक्ष निवडीकडे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांना उपाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली आहे.पक्षाच्या पहिल्या यादीत जोशी आणि बागवे यांचा समावेश झाला आहे.