Pune News | आराखडा आणि निधी तयार असूनही का रखडले आहे ससून रूग्णालयाचे नूतनीकरण ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | शहरातील गरजू व सर्वसामान्य लोकांसाठी सरकारी ससून सर्वोपचार रूग्णालय (Sassoon Hospital) म्हणजे संजीवनी देणारे हॉस्पिटल आहे. पुणेकरांना माफक दरात योग्य आरोग्यसेवा पुरवणाऱ्या ससून सर्वोपचार रूग्णालयाची अवस्था मात्र अतिशय दयनीय झाली आहे. दररोज २ हजारांहून अधिक रूग्णांना सेवा देणाऱ्या या हॉस्पिटलला नवा आकार देण्याचे काम प्रशासनाकडून (Administration) हाती घेण्यात आले आहे. बाह्यरूग्ण विभागाच्या नूतनीकरणाचा (Renovation) घाट घालण्यात आला असला तरी, विभागाच्या स्थलांतर मुद्द्यावरून हा प्रकल्प सुरु होण्यास अडथळा निर्माण करत आहे. (Pune News)

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (Public Works Department) नूतनीकरणाचा आराखडा २ महिन्यांपासून बनवून तयार आहे. मात्र जागेच्या प्रश्नावरून काम सुरु झाले नाही. काही विभाग स्थलांतरित झाल्याशिवाय हे नूतनीकरण होणे शक्य नाही. बाह्यरूग्ण विभागातील (Outpatient Department) सध्याच्या जागेवरील युनिट हलविल्याशिवाय नूतनीकरण वेगाने होणार नाही. त्यामुळे आराखडा आणि निधी तयार असूनही संपूर्ण नूतनीकरणास किमान एक वर्षाचा कालावधी लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यासंबंधीत ससून रुग्णालयामध्ये अंतर्गत बैठका सुरू आहेत. येत्या काही दिवसांत दोन विभाग स्थलांतरित केले जाणार आहेत.

रुग्णालयातील सध्याची स्थिती बिकट असून उपचारासाठी आलेल्या रूग्णांची गैरसोय होत आहे.
बाह्यरुग्ण विभागात उपचारांच्या विभागांच्या पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत.
खिडक्यांवर फक्त कागदाच्या तुकड्यांवर विभागांची नावे लिहिलेली आहेत.
त्यामुळे रुग्णांना कोणता विभाग कोठे आहे. कोणत्या चाचण्यासाठी (Medical Tests) कोठे जायचे याची माहिती
सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे दररोज ओपीडीच्या (OPD) वेळेत विभागात गदारोळ माजलेला असतो.
त्यामुळे बाह्यरुग्ण विभाग डिजिटल (Digital) स्वरूपाचा करण्यात येणार असून त्यामध्ये अत्याधुनिक
पद्धतीचे विभागीय बोर्ड लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर रूग्णांसाठी आवश्यक असणारी इतर माहिती दर्शनी
भागात लावली जाणार आहे. अशी माहिती ससूनचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर (Dr. Sanjeev Thakur)
यांनी सांगितली आहे. (Pune News)

Web Title : Pune News | Why is the renovation of Sassoon Hospital stalled even though the plan and funds are ready?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे ग्रामीण पोलिसांकडून कोल्हापूर जिल्हयातील दरोडेखोरांच्या टोळीला अटक ! 25 लाखाचा माल जप्त, सातारा येथून सोनं-चांदी लुटलं होतं; जाणून घ्या स्टोरी

Shambhuraj Desai | ‘दोन दिवसांची मुदत, वक्तव्य मागे घ्या अन्यथा…’, शंभूराज देसाईंचा विनायक राऊतांना इशारा

Maji Sainik Sanghatana | माजी सैनिक संघटनेचे अधिवेशन उत्साहात