Pune News : गांजा बाळगल्याप्रकरणी महिलेला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  विक्री करण्यासाठी २ किलो ५६० किलो वजणाचा गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी एका महिलेला अटक केली. न्यायालयाने तिला ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

नंदा पवार (वय ५९, रा. हिंगणे खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा मुलगा महेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार रुबी अब्राहम यांनी या बाबत फिर्याद दिली आहे. सोमवारी (ता. ८) तुकाईनगर झोपडपट्टी परिरात ही घटना घडली. नंदा ही तुकाईनगर झोपडपट्टी परिसरात बेकायदा ५१ हजार रुपयांचा २ किलो ५६० ग्रॅम वजनाचा गांजा जवळ बाळगून असताना पोलिसांना मिळाली होती. तिच्याकडे विचारणा केली असता तिने हा गांजा मुलगा महेश याने तिला दिले असल्याचे तिने सांगितले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तिला न्यायालयात हजर केले असता हा गांजा त्यांनी कोठून आणला? तिचा आणखी कोणी साथीदार आहे का? त्यांनी अशा प्रकारे आणखी गांजाची साठवणूक केली आहे का? यासह गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी तिला पोलिस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली. त्यानुसार न्यायालायने पोलीस कोठडी सुनावली.