Pune News : स्वच्छतागृहात गेल्यानंतर झटका येऊन महिलेचा मृत्यू, वारसदार बनून ‘दामिनी पथका’नं पार पाडली जबाबदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वच्छतागृहात गेल्यानंतर ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेल्या महिलेचे वारसदार पुणे पोलिसांच्या “दामिनी पथकाने” होत जबाबदारी पार पडली. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

फडगेट परिसरातील एका रुग्णालयात महिला चेकअप करण्यासाठी आली होती. चेकअपसाठी थांबल्यानंतर त्या स्वच्छतागृहात गेल्या. पण, दुर्दैवाने त्यांना त्याच ठिकाणी ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्या खाली थेतच कोसळल्या. रुग्णालयातून फोन येताच फडगेट पोलीस चौकीची मार्शल तेथे गेली. महिला असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी दामिनी पथकाला बोलावले. यावेळी दामिनी पथकाच्या महिला कर्मचारी श्वेता वलेकर आणि सुजाता व्हनहुने यांनी त्या महिलेला स्वच्छतागृहातून बाहेर काढले. तसेच रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. दरम्यान मृत्यू झालेली महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तिचा मृतदेह देण्यात आला नाही. तिच्यावर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

तर याठिकाणी दामिनी पथक व मार्शल कर्मचाऱ्यांना टेस्ट करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यामुळे मात्र दामिनी पथकातील महिला कर्मचारी टेन्शनमध्ये आल्या आहेत. परंतु, त्यांच्या या कामगिरीचे रुग्णालय व नागरिकांकडून कौतुक होत आहे. ही महिला मध्यवस्तीत राहत होती. तिला कोणीच नातेवाईक नसून शेजारीचे तसेच ओळखीच्या व्यक्ती देखील येत नव्हत्या. पण पुणे पोलिसांच्या दामिनी पथकाने तिच्या वारसाची जबाबदारी पार पडली.