Pune News : महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे – बापूसाहेब बिबे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पतसंस्था कार्यरत आहेत. बचत गट, पेन्शन, दामदुप्पट, स्वयंसहायता योजनांचा महिलांनी लाभ घेऊन विकास साधला पाहिजे. ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध सेवा पतसंस्था देत आहेत, अशी माहिती संस्थेचे मार्गदर्शक बापूसाहेब बिबे यांनी दिली.

सावळ (ता. बारामती, जि. पुणे) धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादितच्या वतीने आदर्श महिला शेतकरी पुरस्कार आणि दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी स्नेहा अशोक विरकर यांना बारामती पंचायत समितीचे माजी सभापती संदीप बांदल यांच्या हस्ते आदर्श महिला शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अकरा हजार रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे संचालक दत्तात्रय आवाळे, संतोष आटोळे, भारत मोकाशी, किशोर फडतरे, रमेश साबळे, प्रा. सागर आटोळे, दीपक देवकाते, दत्तात्रय जगन्नाथ आवाळे, प्रमोद आवाळे, किरण गावडे, विठ्ठल आटोळे, किशोर वीरकर, महादेव वीरकर, आदेश थोरात, सागर भगत, रमेश देवकाते, दादासाहेब पवार, नारायण मलगुंडे, सचिन आवाळे, संजय बनसोडे, दत्तात्रय पवार, पोलीस पाटील गायत्री साबळे, पतसंस्थेच्या अध्यक्षा राणी बिबे, उपाध्यक्षा सुनीता आवाळे, ज्योती आवाळे, अपर्णा देवकाते आदी उपस्थित होते. अनिल आवाळे साबळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले.