Pune News : कामगारानेच बनावट चावीव्दारे 60 हजारांचे कपडे चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुकानातील कामगारानेच बनावट चावी तयार करून त्याद्वारे 60 हजार रुपयांचे कपडे चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्या कामगाराला अटक केली आहे.

महंमद शाहिद बबलू सिद्धीकी (वय 22, रा. सोमवार पेठ) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत मंजूर आलम (वय 59) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजूर आलम यांचे रविवार पेठेत काझी कॉम्प्लेक्स येथे कपडे विक्रीचे दुकान आहे. गेल्या काही महिन्यांपासून कामगार महंमद हा येथे काम करत होता. यादरम्यान त्याने दुकानाची बनावट चावी तयार केली. तसेच यानंतर त्याने दररोज रात्री दुकान बंद झाल्यानंतर मध्यरात्री येऊन दुकान उघडून त्यातून कपडे चोरत असे. हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादी यांनी याची माहिती घेतली. त्यावेळी त्याने काही दिवसात 60 हजार रुपयांचे कपडे चोरले असल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी महंमद याला अटक केली आहे. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.