Pune News | इमारतीचं बांधकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला मजूर; 2 तासानंतर सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | इमारत बांधकामाचं काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने एक मजूर ढिगा-याखाली अडकला होता. धक्कादायक बाब म्हणजे मजुर तब्बल 2 तास ढिगा-याखाली अडकुन होता. हा प्रकार कल्याणीनगर (Kalyani Nagar) परिसरात घडला आहे. दोन तासाच्या प्रयत्नानंतर मजुराला सुखरुप बाहेर काढलं आहे. येरवडा अग्निशमन केंद्रातील (Fire station) वाहनचालक गणेश पराते (Ganesh Parate), जवान वसंत कड (Vasant kad), सुनिल खराबी (Sunil Kharabi), रतन राऊत (Ratan Raut) यांनी तातडीनं मातीत अडकलेल्या मजूराची सुटका करण्यात त्यांना यश (Pune News) आलं आहे.

कल्याणीनगर येथील सुग्रा टेरेस येथे इमारतीच्या नूतनीकरणाचे काम दुपारी 12 च्या दरम्यान सुरु होतं. त्यावेळी तेथे सात ते आठ मजुर काम करीत होते. काही न कळताच अचानक मातीचा ढिगारा कोसळला. त्याक्षणी मजुर सैरावैरा धावू लागले. मात्र, त्या मजुरांपैकी एकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडला. आणि खाली दबला गेला. अशी माहिती अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलीय.

दरम्यान, याबाबत माहिती समजताच अग्निशामक विभागाच्या अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
नंतर इमारती येथील ढासळलेला ढिगारा बाजूला करण्यात आला. या कामाला तब्बल 2 तास लागले.
दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर मजुराला ढिगा-याबाहेर काढण्यात यश (Pune News) आले.
त्यांनतर मजुराला रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्या मजुृराची प्रकृती ठिक आहे.
असं अधिका-यानं सांगितलं आहे.

 

Web Title : Pune News | Workers stuck under a mound of mud while construction of a building was underway; Release after 2 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Anti Corruption | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकार्‍यासह एका संस्थेचा सचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Corporator Archana Patil | आईवडील गमवलेल्या बालकांचे होणार सर्वेक्षण ! नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या मागणीला मुख्य सभेची मान्यता

Municipal Elections | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मुंबई वगळता पुणे-पिंपरीसह सर्वच महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक