Pune News | महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान स्वप्निल पाडाळेचे निधन, लाल मातीतच घेतला अखेरचा श्वास; दुर्दैवी घटनेमुळे पुणे हळहळलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | लाल मातीत सराव करत असताना एका पैलवानाचा (Wrestler) हृदयविकाराच्या धक्क्याने (Heart Attack) मृत्यू (Death) झाला. ही दुर्दैवी घटना पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत सकाळी साडे सातच्या सुमारास घडली. पैलवानाच्या (Pune News) अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे Swapnil Dnyaneshwar Padale (वय-31) असे मृत्यू झालेल्या पैलवानाचे नाव आहे. बुधवारी सकाळी मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत ही दुर्दैवी घटना घडली. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील (Mamasaheb Mohol Wrestling Complex) पैलवान स्वप्निल पाडाळे हा महाराष्ट्र चॅम्पियन होता. स्वप्निलच्या आकस्मिक जाण्याने त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.

स्वप्निल नेहमीप्रमाणे मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत आला होता.
कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे तो देखील व्यायाम करत होता.
व्यायाम करत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो खाली पडला.
स्वप्निल अचानक खाली पडल्याचे पाहून तालमीतील इतरांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Web Title : Pune News | wrestler dies of heart attack while practicing incident in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bachchu Kadu | आमदार बच्चू कडूंना कोर्टाचा दिलासा, तात्पुरता जामीन मंजूर

Pune Crime News | पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणार्‍या युवतीवर बलात्कार; दौंड येथील घटना, आरोपी अटकेत

Pune PMC Property Tax | मिळकतकर सवलतीसाठी पुढील आठवड्यात बैठक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन