×
Homeताज्या बातम्याPune News | बारामतीत नवविवाहितेबरोबर नियतीचा खेळ; लग्नाला आठवडा पण झाला नसताना...

Pune News | बारामतीत नवविवाहितेबरोबर नियतीचा खेळ; लग्नाला आठवडा पण झाला नसताना नवऱ्याचा अकाली मृत्यू

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | लग्नाला केवळ 6 दिवस झाले असताना एका नवविवाहितेबरोबर (Newlyweds) नियतीने मोठा खेळ केला आहे. अजून दारासमोरील लग्नाचा मांडवही निघाला नसताना त्याच मांडवात तिला तिच्या नवऱ्याची अंतयात्रा निघताना पाहावे लागले आहे. सचिन ऊर्फ बबलू अनिल येळे Sachin aka Bablu Anil Yele (वय 27, रा.येळेवस्ती, माळेगाव) असे मयताचे नाव असून त्याचा विवाह हर्षदा संतोबा बोरकर Harshada Santoba Borkar (रा. पिपळा जि. परभणी) हिच्याशी 19 नोव्हेंबर रोजी झाला होता.

शारदानगर येथील अनुज गार्डन येथे अतिशय थाटात या दोघांचा विवाह पार पडला होता.
या विवाहानंतर येळे कुंटुबाने परंपरेनुसार देवदर्शन घेतले आणि त्यांच्या सुखी संसारासाठी प्रार्थना केली होती.
मात्र, गुरुवारी पहाटे सचिनला अस्वस्थ वाटू लागले. त्याला हृदय विकाराचा तीव्र धक्का आला आणि त्यातच त्याचे निधन झाले.

सचिन येळे यांच्या मागे पत्नी, आई, वडील, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
त्याच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण माळेगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :- Pune News | young man passed away due to heart attack in just 6 days after marriage at yelevasti in baramati taluka pune district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Udayanraje Bhosale | राज्यपालांना अडीच वर्षात शिवाजी महाराज समजले नाहीत, त्यांना तात्काळ पदमुक्त करा; उदयनराजेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

BJP Vs Congress In Maharashtra | भाजपच्या दोन दिग्गजांमध्ये बेबनाव…, काँग्रेस नेत्याचं विधान

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News