Pune News : घरफोडी केल्याप्रकरणात तरूणास कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  खिडकीतून घरात घुसत कपाटात ठेवलेले दागिने व रोकड लंपास केल्याप्रकरणात एका तरूणास विमानतळ पोलिसांनी अटक केली. कनवरसिंग कालुसिंग टाक (वय २०, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला दोन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी, ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. १३ ऑगस्ट २०२० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी यांच्या लोहगाव येथील घरात चोरी झाली होती. फिर्यादी यांचा लहान मुलगा हॉलमध्ये झोपलेला असताना चोरट्यांनी बेडरूमच्या खिडकीचे गज वाकवले व तेथून आत प्रवेश केला. त्यानंतर सहा लाख ९१ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रोकड चोरून नेल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.