दिलासादायक ! पुण्यात ‘कोरोना’चा हॉटस्पॉट बनलेल्या पाटील इस्टेटमध्ये 13 दिवसात एकही नवीन रूग्ण नाही आढळला, 202 रूग्ण झाले बरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात झोपडपट्टीत कोरोनाने शिरकाव केला असल्याने प्रशासन कडक उपाय योजना करत आहे. अश्यातच दिलासादायक बातमी असून, कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पाटील इस्टेटमध्ये गेल्या 13 दिवसात एकही रुग्ण सापडलेला नाही. तर हा परिसर कोरोनामुक्त देखील होण्याच्या मार्गावर आहे. कारण 210 पैकी 202 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता 4 रुग्णांबर उपचार सुरु आहेत.

त्यात महत्वाची भूमिका बजावली आहे, ती पोलीस प्रशासनाने. त्यांनी केलेल्या उपाययोजना यामुळे कोरोना रुग्ण वाढत नसून नागरिकांनी देखील याकाळात प्रशासनाने केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्याने ही किमया झाली आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रत्येक भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्याला आवर घालण्यासाठी पोलीस, पालिका आणि जिल्हा प्रशासन मोठी कसरत करत आहे. महत्वाची भूमिका पोलीस पार पाडत आहेत. शिवाजनगर पोलिसांनीं कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाटील इस्टेट परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना केले आहे. त्याचाच फायदा दिसून येत आहे. पाटील इस्टेट येथे 1 हजार 342 जणांची चाचणी केली. त्यामध्ये आढळुन आलेल्या पॉझीटीव्ह रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले गेले. त्याशिवाय त्याच्या संपर्कातील 600 रहिवाशांना बालेवाडी, पॉलिटेक्निक कॉलेज शिवाजीनगर, सिंहगड इन्स्टीटयुट याठिकाणी विलगीकरण करण्यात आले होते. तसेच स्वयंसेवी संघटना, सामाजीक कार्यकर्ते यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, फुड पॅकेटस घरपोच पुरविणेत आली.यावेळी पोलिसांनी रुग्ण संख्या वाढू नये म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून काम केले. 5 ठिकाणी फिक्स पॉईंट केले. तर नाकाबंदी करण्यात आली. वाकडेवाडी बस स्टँड ते पाटील इस्टेट झोपडपट्टीकडे जाणारे मार्गावर एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्याशिवाय एक अधिकारी व 31 पोलिस कर्मचाऱ्यांना फिक्स पॉईंट देण्यात आला आहे. तसेच 10 ठिकाणी सीसीटीव्ही बसवून कन्टेन्मेंट झोन असलेल्या भागावर नियंत्रण ठेवले जात होते. तसेच वेळोवेळी सदर ठिकाणचे ड्रोन कॅमेराव्दारे शुटिंग करून नजर ठेवण्यात येत आहे. त्याशिवाय 14 ठिकाणी वॉच टॉवर उभारुन नागरीकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

—चौकट—

1)  पाटील इस्टेटकडे जाणारा मुख्य रस्त्यावर लगत ३८ ठिकाणी बॅरीकेटींग करुन भाग पुर्णत: सिलबंद करण्यात आला आहे.

3)  क्विक रिस्पॉन्स टीमचा बंदोबस्त तैनात करून तातडीच्या सेवेसाठी स्वतंत्र पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक व दोन अ‍ॅम्ब्युलन्ससह तैनात करण्यात आले आहे.

3)   पाटील इस्टेट भागात कोरोना बाधीत रुग्ण अथवा त्याचे संपर्कात आलेले इतर नागरीकांना त्यांच्या घरी जावून तपासणी करण्यात येत आहे.

4)   परिसरातील गल्ली बोळांमध्ये जावून रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईकांचे घरी जाऊन समुपदेशन करण्यात येत आहे.

5)   सार्वजनीक शौचालयाव्दारे कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून महापालिकेशी पत्रव्यवहार करुन एकुण २० फिरते शौचालयांची व्यवस्था करण्यात आली.

6)   लोकांना हॅन्डवॉश करण्यासाठी सात ठिकाणी वॉश बेसीन बसविणेत आली आहेत.