ढगाळ वातावरणामुळे सोमवारपासून सूर्य’दर्शन’ नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  सोमवारी मध्यरात्री विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण आणि मध्येच हलकीशी पावसाचे थेंब झेलण्याची वेळ उपनगर आणि परिसरातील नागरिकांवर आली. ढगाळ वातावरणामुळे सोमवारपासून आज मंगळवारी दुपारपपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. आज (मंगळवार) भल्या पहाटेपासून हलके धुके पडले असून, अंधार असल्याचे जाणवत आहे.

कोरोना विषाणूचे रुग्ण आणि बाधित वाढत आहेत. त्यातच कालपासून वातावरणात एकदम बदल झाल्याने आता कोरोनाचा विषाणू वाढणार की काय, या भीतीने नागरिकांची गाळण उडाली आहे. कोरोनाविषाणूचे उपनगर आणि लगतच्या खेड्यात घबराटीचे सावट कायम आहे. पाचव्या लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग-धंदे, कंपन्या आणि बहुतेक सर्वच दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यातच मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांनी छत्री, रेनकोट खरेदी करण्याकडे धाव घेतली आहे. शाळा-महाविद्यालये सुरू होण्याची वेळ निश्चित नाही. मात्र, दहावी-बारावीची निकाल लागल्यानंतर शाळा सुरू होतील, असा तर्क नागरिकांमध्ये सुरू आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. परभणी, कोल्हापूर आणि साताऱ्यात मुसळधार पाऊस बरसला आहे. तर पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाच्या तुरळक सरी जाणवल्या. सांगली जिल्ह्यात आज पहाटेपासून संततधार सुरू आहे. तर कोकणसह मुंबई आणि ठाण्यात तीन ते पाच जूनदरम्यान पावसाचं आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने सोमवारी मध्यरात्री जोरदार हजेरी लावली असून, सर्वत्र रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. शिवाय सोमवार दिवसभर आणि मंगळवारी रात्रीपासून दुपारपर्यंत अधून मधून पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. यामुळे शहर आणि जिल्हावासीयांना उकाड्यापासून मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. रात्री अनेक जिल्ह्यातील तालुक्यात जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावल्याने मागच्या महिनाभरापासून जाणवणाऱ्या उकड्यापासून मात्र जिल्हावासीयांची मुक्तता झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like