‘आनंदी आनंद’ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचाऱ्यांच्या यंदा नाही होणार बदल्या, काही जणांचा ‘हिरमोड’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलीस दलातील वार्षिक बदल्या यंदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक यांच्या बदल्या होणार नाहीत. यामुळे सर्वत्र “आनंदी आनंद” झाला आहे. असे असले तरी काहींचा मात्र हिरमोड देखील झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पोलीस दलात दरवर्षी जून-जुलै या महिन्यात बदल्या होत असतात. त्यात वरिष्ठ अधिकारी ते पोलीस कर्मचारी सर्वांच्या बदल्या होतात. अर्थातच ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अश्या बदल्या प्रामुख्याने केल्या जातात. प्रत्येक शहर आणि जिल्ह्यात अंतर्गत बदल्या यांना मात्र अनन्य असे महत्व असते किंवा ते केले जाते.

शिपाई ते सहायक उपनिरीक्षक यांचा पोलीस ठाणे किंवा इतर विभागातील 6 वर्षांचा कार्यकाळ झाल्यानंतर त्यांची दिसऱ्या ठिकाणी बदली केली जाते. त्यामुळे या बदल्यांचा काळ सुरू होताच प्रत्येकजण आपापल्या परीने आवडते ठिकाण मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतो. अनेकजण ओळखी आणि वशीला देखील लावतात. त्यामुळे या बदल्याना विशेष महत्व असत.

मात्र यंदा या बदल्या होणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात हा नियम लागू असणार आहे. त्यात सध्या तरी पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक यांच्या बदल्या होणार नाहीत.

त्यामुळे पुणे शहर पोलीस दलात सध्या आनंदी वातावरण आहे. भहुतांश पोलिसांना याचा आनंद झाला असला तरी अनेकांचा हिरमोड देखील झाला आहे. कारण अवडतीच्या ठिकाणी बदलून जाण्यासाठी गेली कित्येक दिवस वाट पाहिली आणि प्रत्यन देखील करण्यास सुरुवात केली होती. आता मात्र या आदेशामुळे ते सर्व स्वप्न अधुरे राहिले आहे.

पुणे पोलिसांनी बदल्यांची माहिती मागवली होती. पण राज्य शासनाने 4 मे रोजी आदेश काढले असून, त्यात कोरोना महामारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध विभागाअंतर्गत उपाययोजनामध्ये सातत्य राखण्यासाठी चालू वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करू नये. त्यानुसार पुणे पोलिसांनी देखील बद्दलयांबाबत माहिती न पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.