Pune : कुविख्यात शाम दाभाडे टोळीचा सदस्य अन् मोक्क्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुविख्यात श्याम दाभाडे टोळीचा सदस्य व मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का लावला होता.

योगेश उर्फ पप्प्या प्रकाश दाभाडे (वय 24, सध्या . रा. चेंबूर मुंबई, मूळ. रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. योगेश उर्फ पप्प्या दाभाडे हा पोलिसांच्या (police) रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहे. तडीपार, पाहिजे आरोपी आणि सराईत गुन्हेगार यांची माहिती काढून त्यांना जेरबंद करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिल्या आहेत. दरम्यान, खंडणी विरोधी पथक एकचे पोलिस police अमलदार नितीन रावळ व पोलीस नाईक राजेंद्र लांडगे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पौड पोलीसांनी मोकक्कनुसासर कारवाई केलेला गुन्हेगार चेंबूर येथे आहे. त्यानुसार त्याला सापळा रचून अटक केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस police निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदनाखाली पोलीस नाईक नितीन कांबळे, राजेंद्र लांडगे, नितीन रावळ, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण, रमेश चौधर,अमर पवार, गजानन सोनवलकर, विजय कांबळे, हनुमंत कांदे, पिराजी बेले, संजय भापकर, मधूकर तूपसुंदर, संदेश निकाळजे, ऋषिकेश महल्ले, हेमा ढेबे, अश्विनी केकान या पथकाने केली आहे.

Also Read This : 

टाचांच्या भेगांनी त्रस्त आहात तर मग ‘या’ टिप्स फोलो करा; जाणून घ्या

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम माधुरी पवारच्या डान्सने चाहते घायाळ !

Paytm : तुम्हाला देखील कॅशबॅक ऑफरचा मेसेज आलाय तर व्हा सावध अन्यथा…

माझ्यामुळं सत्ता गेल्याचं फडणवीसांना दु:ख; संजय राऊतांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला

रक्षा खडसेंचा मोठा खुलासा ! म्हणाल्या – ‘एकनाथ खडसे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बोलणं झालं’

मुंबई HC ची ठाकरे सरकारला सूचना, म्हणाले – ‘अदर पुनावालांना देशात सुरक्षित वाटत नसेल तर तुम्ही त्यांना आश्वस्थ करा’