Pune : हडपसर गाडीतळ ते मंडई दरम्यान भाजीविक्रेत्यांमुळे कोरोनाला पोषक वातावरण?

पुणे : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागिल तीन आठवड्यांपासून राज्यात कडक निर्बंध केले आहेत. मात्र, दररोज सकाळी साडेसहा ते दुपारी 12 वाजेपर्यंत सोलापूर रस्त्यावर हडपसर गाडीतळ ते पं. जवाहरलाल नेहरू मंडईपर्यंत भाजीविक्रेते आणि खरेदीदारांची प्रचंड गर्दी असते. हडपसर पोलीस स्टेशन आणि पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. कोरोना महामारी रोखण्याऐवजी वाढण्यासाठीच पोषक परिस्थिती निर्माण होत आहे. दुसरीकडे मास्क नसेल तर पोलीस लगेच कारवाई करण्यासाठी सरसावतात, मात्र अनधिकृत भाजीविक्रेत्यांची प्रचंड गर्दी होताना कारवाई करण्यासाठी का पुढे येत नाहीत, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हडपसर गाडीतळावर पोलिसांनी व्हॅन उभी असते. पोलीस कर्मचारी कामावर जाणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून असतात. वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवर चार-दोन नागरिक दिसले की, लगेच गर्दी करू नका, मास्क लावा, आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नका, अशी दमदाटी करतात. मात्र, हीच मंडळी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न सामान्यजनांना पडला आहे. हडपसर गाडीतळ सतत वर्दळीचा परिसर आहे. पीएमपी बसेस, रिक्षा आणि इतर खासगी वाहनने उभे करण्यासाठी जागा दिसत नव्हती. मात्र, लॉकडाऊनमुळे येथे दिवसभर सन्नाटा दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाने कारवाई जरूर केली पाहिजे मात्र, ती सरसकट असली पाहिजे, अशी भावना कामगारवर्गाकडून केली जात आहे.

पोलिसांची व्हॅन सकाळी साडेदहाच्या सुमारास नियमांचे पालन करा, अकरा वाजता दुकाने बंद करा असा आदेश सोडत निघून जाते. मात्र, अनेक दुकानदारांकडून मागच्या दाराने व्यवहार सुरू असतात. रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने पोलिसांना दिसतात. कोरोना फक्त रस्त्याने फिरतो का, भाजीविक्रेत्यांच्या ठिकाणी गर्दी असते, तिथे कोरोना नसतो का, असा खोचक सवालही काही मंडळींनी उपस्थित केला आहे.

कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागिल तीन आठवड्यांपासून राज्यात कडक निर्बंध केले आहेत. मात्र, दररोज सकाळी साडेसहा ते दुपारी 12 वाजेपर्यंत सोलापूर रस्त्यावर हडपसर गाडीतळ ते पं. जवाहरलाल नेहरू मंडईपर्यंत भाजीविक्रेते आणि खरेदीदारांची प्रचंड गर्दी असते. हडपसर पोलीस स्टेशन आणि पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. कोरोना महामारी रोखण्याऐवजी वाढण्यासाठीच पोषक परिस्थिती निर्माण होत आहे. दुसरीकडे मास्क नसेल तर पोलीस लगेच कारवाई करण्यासाठी सरसावतात, मात्र अनधिकृत भाजीविक्रेत्यांची प्रचंड गर्दी होताना कारवाई करण्यासाठी का पुढे येत नाहीत, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.