Pune : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर; पुण्यात एकाविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकून तो प्रसारित केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52, रा. माऊली बंगलो, जिल्हा परिषद शाळे जवळ, वडगाव शिंदे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी आनंद रामनिवास गोयल (वय 44) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे याने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरून राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत केली. मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नीची नीतिभ्रष्ट करण्याच्या उद्देशाने जाणून-बुजून पोस्ट करत घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य करून त्यांची बदनामी केली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत.