पुणे : अलार्मच्या आवाजाने तेल चोरीचा डाव फसला

दिघी : पोलीसनामा ऑनलाईन

तेलाच्या पाईप लाईन जवळ खड्डा खोदून तेल चोरी करणासाठी गेलेल्या चोरट्यांचा डाव अलार्म वाजल्यामुळे फसला. ही घटना शनिवारी रात्री पावणे बारा ते पावणे दोन दरम्यान वडमुखवाडी येथील एचपीसीएल पाईपलाईनजवळ घडली.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5402799e-9ef3-11e8-883e-3dacdc7fce2d’]

याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एचपीसीएल कंपनीचे ऑपरेशनल अधिकारी ब्रिजेश मिना (वय-३५ रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एचपीसीएल या कंपनीच्या तेलाची पाईप लाईन अज्ञातांनी शनिवारी पहाटे फोडण्यशाचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी पाईपलाईन शेजारी तीन फूट खोल खड्डा खोदला होता. मात्र खड्डा खोदताच कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेद्वारे बसवलेला अलार्म कंपनीच्या मुख्यालयात व खोदकामाच्या ठिकाणी वाजला. यामुळे चोरही बिथरले. यावेळी गस्तीवर असणारे पथक ही घटनास्थळी दाखल झाले मात्र त्या पूर्वीच चेरट्यांनी तेथून धूम ठोकली हाेती.
[amazon_link asins=’B00LLEN5FQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8a1da42f-9ef3-11e8-bb90-978fafb12ceb’]
खासगी कंपन्याद्वारे त्यांच्या तेलपुरवठा करणाऱ्या लाईनजवळ सेंन्सर बसवण्यात आलेला असतो. ज्यामुळे कोणी या लाईनशी छेडछाड करत असेल तर त्याची माहीती लगेच कंपनीच्या मुख्यालयात अलार्मद्वारे कळते. याप्रकरणी दिघी पोलीसठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गीरी हे तपास करत असून त्यांनी सांगितले की हा नेमका चोरीचा प्रयत्न होता की इतर कारणासाठी खेदकाम केले जात होते याबाबत आम्ही तपास करत आहोत.

इतर बातम्या
जगण्यासाठी सगळ्यात सुंदर शहर कोणतं रे भाऊ ?  

विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार