उल्हासनगर येथील खुनाच्या गुन्ह्यात फरार झालेल्या सराईताला पुण्यात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उल्हासनगरमध्ये मित्राचा गोळ्या झाडून तसेच हत्याराने वार करून खून केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांपासून गुंगारा देत फरार झालेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले.

आफताब उर्फ सलीम महंमद खलिफ शेख (27, रा. उल्हासनगर, ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दोन महिन्यांपूर्वी उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आफताबने त्याचा मित्र भरत उर्फ सोन्या चंद्रकांत लष्करे याचा पूर्ववैमनस्यातून इतर मित्रांच्या मदतीने देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला होता. यावेळी त्याच्या गळ्यावर धारदार हत्यारांनी देखील वार करण्यात आले होते.

आफताब हा खुनाचा गुन्हा केल्यापासून उल्हासनगर येथून फरार झाला होता. तो पळून जावून वेगवेगळ्या शहरात वास्तव्यास होता. फरार कालावधीत त्याने दिल्ली, अजमेर, आझमगड, हैद्राबात या ठिकाणी वास्तव्य केले. रविवारी (दि. 12) आफताब नगररोड येथील खराडी बायपास येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी, यांना याबाबत सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, सहायक पोलिस फौजदार अब्दुलकरीम सय्यद, पोलिस हवालदार गणेश साळुंके, सुरेंद्र साबळे, राकेश खुनवे यांचे पथक तयार करून खराडी बायपास येथे सापळा लावण्यात आला.

आफताब हा सोमवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास खराडी बायपास येथील हॉटेल सागर येथे आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी करिता उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलिसांच्या हवाली करण्यात करण्यात आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/