पिकअप चोरणार्‍या सराईताला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सिंहगड रोड परिसरातून पिकअप चोरणार्‍या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला पिकअप जप्त करण्यात आला आहे.
सोमनाथ सुभाष चौधरी (रा. कोल्हेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

शहरात घरफोड्या अन् वाहन चोर्‍या त्यासोबतच भुरट्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त वाढविण्यात आली आहे. सिंहगड रोड पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कर्मचारी दया तेलंगे-पाटील यांना चौधरी याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यानुसार त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पिकअप जप्त केले

You might also like