पुण्यात गांजाची विक्री करण्यास आलेला पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर रित्या गांजा विक्री करणार्‍यास आलेल्यास विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 33 हजारांचा दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पुरन छितानीप्रसाद मिश्रा (वय 33, रा. विमाननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगरमध्ये एका महाविद्यालयाजवळ अंमली पदार्थांची विक्रीच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. विमानतळ पोलिस पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पुरन विमाननगरमध्ये गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याचाकडून 1 किलो 585 ग्रॅम गांजा जप्त केला.