Pune : आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाची तस्करी, एकाला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाची तस्करी करणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून दोन जिंवत मांडूळ जप्त करण्यात आले आहेत.

विकास रामचंद्र फडतरे (वय 28, पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विध्यापिठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात एकजण मांडूळांची विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी श्रीधर पाटील व शंकर कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याची खातरजमा केली. त्यानंतर याठिकाणी सापळा रचून विकास फडतरे याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या बॅगची तपासणी केली. त्यात दोन जिवंत मांडूळ प्रजातीचे साप आढळले. पोलिसांनी विकासला अटक केली आहे. विकास शेतकरी असल्याचे सांगत आहे. त्याबाबत तपास सुरू असून, त्याने मांडूळ कोणाला विक्री करण्यासाठी आणले होते, याची चौकशी पोलिस करीत आहेत.
ही कारवाई उपनिरीक्षक महेंद्र पाटील, श्रीधर पाटील, निलेश खोमणे व त्यांच्या पथकाने केली आहे.