फसवणूक प्रकरणी एकाला डेक्कन पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राजेश व त्याच्या साथीदारांवर डेक्कन पोलीस ठाण्यात 2019 मध्ये बनावट कर्ज प्रकरणकरून लाखो रुपये हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यांनी बनावट कागदपत्रे बँकेत सादर केले होते. तसेच त्याठिकाणी बनावट बिल्डर उभाकरून तेथून 50 लाख रुपये घेतले होते. त्यांनतर राजेश हा फरार झाला होता. त्याच्या साथीदारांना पकडण्यात आले होते.

मात्र तो फरार होता. या गुन्ह्याचा तो मास्टर माईंड होता. त्याच्या माग काढण्यात येत होता. परंतु तो गेल्या 1 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याची माहिती काढत असताना तो भोसरी येथील इंद्रायणी भागात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार केंजळे, कर्मचारी महादेव पांचाळ, राकेश गुजर व संजय शिंदे यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.