कुख्यात निल्या वाडकरच्या खुनप्रकरणी आणखी एकजण अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जनता वसाहतीत वर्चस्वाच्या वादातून सराईत गुन्हेगार निल्या उर्फ निलेश वाडकर याचा खून प्रकरणी आणखी एका सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली आहे. १३ जानेवारी रोजी झालेल्या राड्यात चॉकलेट सुन्या आणि त्याच्या साथादीरांनी मिळून कोयत्याने वार करून निल्या वाडकर याचा खून केला होता.

अविनाश सुनील देवकुळे (वय २४, रा. जय भवानी नगर पर्वती पायथा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

ससून जवळून केली अटक

गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकातील कर्मचारी सचिन जाधव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की निल्या वाडकर याच्या खून प्रकरणातील आरोपी अविनाश देवकुळे हा ससून रुग्णालयाच्या गेटजवळ उभा आहे त्यानुसार सापळा रचून त्याला पथकाने ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाई कामी दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

वर्चस्ववादातून निल्या वाडकरचा खून

जनता वसाहतीमध्ये वर्चस्वाच्या वादातून तडीपार असलेल्या चॉकलेट सुन्या आणि निलेश वाडकर यांच्यामध्ये वाद चालु होते. गेल्या महिन्याभरापसुन त्यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. त्यातून १३ जानेवारी रोजी सायंकाळी चॉकलेट सुन्या व त्याच्या साथीदारांनी निल्या वाडकर याचा कोयत्याने सपासप वार करून खून केला.

ही कामगिरी अप्पर पोलीस आय़ुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, दिनेश पाटील, कर्मचारी सचिन जाधव, बाबा चव्हाण, सुधाकर माने, तुषार माळवदकर, सुभाष पिंगळे, विजेसिंग वसावे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

 

You might also like