Pune : बांधकाम साईटवरील सुपरवायझरकडून एकाला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाण्याची टाकी गळते अन त्यातून मच्छर होत असल्याने ती टाकी दुसरीकडे न्या असे म्हणाऱ्या एकाला बांधकाम साईटच्या सुपरवायझरने मारहाण केली आहे. कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी किरण पाटडिया (वय ४७, रा. येवलेवाडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम कन्स्ट्रक्शनच्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे येवलेवाडी परिसरातील डॉ. बंदर वाला लेप्रोसी हॉस्पिटल कर्मचारी वसाहतीत राहतात. तर, शुभम कन्स्ट्रक्शन यांच्याकडून त्यांच्या कामगारांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाण्याची टाकी ठेवली आहे. या टाकीतून पाणी गळत होते, त्यामुळे मच्छरांचा त्रास वाढला आहे, असा आरोप फिर्यादी यांनी केला. ती टाकी दुसरीकडे हलवावी, अशी विनंती केली. मात्र, त्याचा राग आल्याने सुपरवायझरने हातातील हेल्मेटने फिर्यादीच्या डोक्यावर व नाकावर मारून जखमी केले.