Pune : भिडे पुलाखालील नदीपात्रात वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – भिडे पुलाखालील नदीपात्रात फोटो काढत असताना वाहून गेलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा शोध एनडीआरएफला लागला असून, नाना-नाणी घाटाजवळ मृतदेह सापडला आहे. सौरभ कांबळे (वय 19, रा. ताडीवाला रोड) या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. तर ओंकार तुपधर (वय १८) हा बेपत्ता असून, त्याचा शोध घेतला जात आहे.

धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने दोन दिवसांपूर्वी मुळा-मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे मुळा मुठा नदी दुथडी भरून वाहत होती. यावेळी सायंकाळी सहाच्या सुमारास सौरभ व ओमकार व एक मित्र भिडे पुलाजवळ नदीपात्रात उतरून फोटो काढत होते. कपडे काढून ते पाण्यात उतरले होते. यावेळी एकजण वाहून जाऊ लागला. यावेळी त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र सौरभ गेला. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले होते. अग्निशमन दल व एनडीआरएफ जवानांनी कालपासून या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दिवसभर शोध घेतला. पण ते मिळाले नव्हते. मात्र आज सकाळी नाना-नाणी पार्क घाटात सौरभ याचा मृतदेह मिळाला आहे. एनडीआरएफने मृतदेह बाहेर काढला असून, नातेवाईकांना तो ओळखला आहे. तर ओंकार याचा शोध घेण्यात येत आहे.