कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, दोघे जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारायाचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळेवाडी येथे ही घटना रात्री 11 वाजता घडली.

महावीर बजरंग काळे (वय ४२) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी चंद्रशेखर मारुती अंकलगी (वय २३, रा. अंधेरी, ईस्ट मुंबई ) याला अटक केली आहे. गौतम धाबे आणि मिलींद धाबे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक पी. जे. देसाई यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी महावीर आणि त्यांचे मित्र गौतम व मिलींद दुचाकीवरुन चालले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या चंद्रशेखरने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे खाली पडल्यामुळे महावीरचा जागीच मृत्यू झाला. गौतम आणि मिलींद जखमी झाले. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन गाडेकर करीत आहे.