Pune : भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, लोणी काळभोर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  रस्ता क्रॉस करणाऱ्या एका नागरिकाला भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. लोणी काळभोर परिसरात ही घटना घडली आहे.

विठ्ठल पांडुरंग काळे (वय 48) असे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी योगेश विठ्ठल काळे (वय 27, रा वाघेली वस्ती, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल काळे बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बोरकर वस्ती येथील पेट्रोल पंपासमोर रस्ता क्रॉस करत होते. रस्ता क्रॉस करताच समोरून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना उडविले. यात गंभीर जखमी झाल्याने विठ्ठल काळे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस करत आहेत.