रिक्षा दुभाजकला धडकली चालकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – भरधाव रिक्षा दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रामटेकडी चौकाजवळील बीआरटी मार्गात ही घटना घडली आहे.

प्रकाश बाबूराव साबळे (वय ५२, रा. काळूबाईनगर, खराडी) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विनोद पोतदार यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नउ वाजण्याच्या सुमारास प्रकाश भरधाव रिक्षा चालवित जात होते. त्यावेळी त्यांचे रिक्षावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. रिक्षा दुभाजकाला धडकून ते यात गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी वानवडी पोलिस तपास करीत आहेत.