भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दिघी विश्रांतवाडी चौकात हा अपघात रात्री घडला आहे. गणेश भिमराव कसबे (वय 37, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी भिमराव कसबे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा मुलगा गणेश हा त्याच्या दुचाकीवरून रविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास दिघी-विश्रांतवाडी चौकातून येत होता.

त्यावेळी पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जारोत धडक दिली. यात तो खाली कोसळला. त्याच्या डोक्याला व इतर ठिकाणी जबर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास विश्रातवाडी पोलीस करत आहेत.