पुणे : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे. अपघातानंतर चालक पसार झाला आहे.

सत्यनारायण राजाराम ठाकर (वय ३७,रा.गुजरवाडी,कात्रज) असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे. ठाकर यांचे काका शिवाजी ठाकर (वय ६६,रा.धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार ठाकर तीन दिवसांपूर्वी सकाळी साडेसहाच्या सुमारास शंकर महाराज उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार ठाकर यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या ठाकर यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास उपनिरीक्षक बी.एस.खेंगरे करत आहेत.