पुण्यातील कोंढव्यात 9 व्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू, ठेकेदाराविरूध्द FIR
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बांधकाम सुरू असणार्या बहुमजली इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. कोंढवा परिसरातील उंड्रीत हा प्रकार घडला आहे. परदेशी उदय निशाद (वय 26, रा. लेबर कॉम्प, उंड्री) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार बाळकृष्ण सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्री परिसरात न्याती इस्तेबान फेज 1 येथे बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. निशाद हा येथे इतर कामगारांसोबत काम करत होता. दरम्यान, तो नवव्या मजल्यावर काम करत होता. यावेळी बेडरूमच्या खिडकीतून तो लाकडी शिडी घेत होता. मात्र, त्याचा पाय घसरल्याने तो थेट नवव्या मजल्यावरून खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी ठेकेदाराने मजुरांच्या जिवीताचे व सुरक्षिततेची काळजीच्या दृष्टीने हेल्मेट, सुरक्षित जाळी तसेच सेफ्टी बेल्टची पुर्तता न करता हलगर्जी पणाकरून मृत्यूस जबाबदार ठरल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- निराश व्यक्तीकडे वेळीच द्या लक्ष, ‘ही’ आहेत 4 लक्षणे, होऊ शकतो मृत्यू
- जास्त मीठाचे आहेत ‘हे’ 8 दुष्परिणाम, दोन हात लांबच राहा !
- मोबाईलचे ‘हे’ 7 दुष्परिणाम माहित आहेत का ? जाणून घ्या किती घातक !
- वृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त ‘ही’ समस्या, या 7 महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
- ‘एनर्जी ड्रिंक्स’ चे हे आहेत 4 तोटे, मुलांना अजिबात देऊ नका
- ‘मंकीपॉक्स’ आजाराची ‘ही’ आहेत 7 लक्षणे, वेळीच व्हा सावध !
- अळूची पाने आरोग्यासाठी वरदान! ‘हे’ 7 फायदे जाणून घ्या