Pune : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. खडकी परिसरात हा अपघात सोमवारी सकाळी झाला आहे.

जयवंत चंद्रकांत विश्वकर्मा (वय 38, रा. बोपखेल) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर अरविंदकुमार विश्वकर्मा (वय 24) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी ट्रक चालक इशरत अबार हुसेन (वय 28 नागपूर) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे दाजी जयवंत यांच्यासोबत कामानिमित्त मोपेडवरून सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास खडकी येथील ऑर्डनन्स फैक्टरी मेनगेट समोरून जात असताना अचानक भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. यात जयवंत यांना गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. तर फिर्यादी हे जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ट्रक चालकाला अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक विकास शिंदे हे करत आहेत.