Pune : लष्कर परिसरात एकाचा खून; 48 तासांमधील ‘मर्डर’ची चौथी घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कर परिसरात एका फिरस्त्याचा डोक्यात रॉड घालून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा खून कोणी व का केला, हे समजू शकलेले नाही. दरम्यान शहरात दोन दिवसातील हा चौथा मर्डर असून, एक दिवसातला हा दुसरा खून उघड झाला आहे.

इस्माईल सय्यद (वय 55) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील मोदी खाना परिसरात मशीचा गोठा आहे. या परिसरत तो ताडपत्रीची झोपडी तयार करून राहत होता. त्याच ठिकाणी झोपणे आणि या परिसरात फिरत असे.

दरम्यान, आज सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास एकाने ताडपत्रीत जाऊन पाहिले असता त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्याने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्याची ओळख पटत नव्हती. मात्र, या परिसरातील नागरिकांनी त्याला इस्माईल सय्यद असे म्हणले जात असल्याचे सांगितले आहे. आता पोलीस खून कोणी आणि का केला याचा शोध घेत आहेत.