Pune : आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळं मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलीस दलातील आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाचा संसर्ग झाल्याने दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

सहाय्यक उपनिरीक्षक विलास सरवदे (वय 55) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विलास सरवदे हे चतुशृंगी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. दरम्यान एक महिन्यांपूर्वी त्यांना त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

दरम्यान आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिसवार आहे. पुणे शहर पोलीस दलातील कोरोनामुळे 8 व बळी आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like