Pune : लेबर कॅम्पमधील वायर गुंडाळताना हायटेन्शन वायर अंगावर पडून एक कामगाराचा मृत्यू

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – लेबर कॅम्पमधील वायर गुंडाळताना हायटेन्शन वायर अंगावर पडून एक कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंबेगाव बुद्रूक येथील श्री संकुल बिल्डिंग भैरवनाथ मंदीराजवळ घडली. याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजीवन फागूराम साहू (वय ४०, रा. आंबेगाव ) असे मृृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कंत्राटदार लक्ष्मण रुपला राठोड (वय ४०, रा. आंबेगाव बुद्रूक ) याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हे कंत्राटदार आहेेेत. त्यांनी राहत्या घरातून इमारतीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत लेबर कंम्पला अनधिकृतरित्या वीज कनेक्शन दिले होते. त्यांच्या सांगण्यावरुन संजीवन लेबर कंपमधील वायर गुंडाळित होता. त्यावेळी हायटेन्शनची वायर अंगावर पडल्यामुळे संजीवनला वीजेचा धक्का बसला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास सहायक निरीक्षक कवठेकर करीत आहेत.