ये बात ! केवळ 310 रूपयांत उरकले लग्‍न, पत्नीला उच्चशिक्षण देणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नसमारंभ म्हणजे मानपान आणि अनाठायी खर्च हे समीकरण जवळपास रूढच झालेले आहे. लग्नामध्ये अधिकाधिक दिखाऊपणा करण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र याला पुण्यातील एक विवाह अपवाद ठरला आहे. अहिरे गावातील विशाल चौधरी आणि खडकवासला येथील भाग्यश्री मते यांनी अवघ्या ३१० रुपयात विवाह उरकला आहे. विशालने वास्तुविशारदचा डिप्लोमा केला असून तो मागील १२ वर्षांपासून बांधकाम व्यवसायात आहे. सध्या त्याची स्वतःची फर्म आहे. भाग्यश्रीने कला शाखेची पदवी, आयुर्वेद डिप्लोमा केला असून सध्या भारती विद्यापीठात वास्तूविशारद (आर्किटेक्चर) च्या पाचव्या वर्षात ती शिकत आहे.

या आगळ्यावेगळ्या लग्नसमारंभाविषयी माहिती देताना नवरदेव विशालने सांगितले की , ‘महात्मा फुले यांच्या विचाराने प्रभावित होऊन मी लग्नात अनाठायी खर्च करायचा नाही असे ठरवले. दोघांच्याही घरच्यांना या निर्णयाला विरोध केला. नोंदणी विवाह केल्यानंतर किमान आळंदीला जाऊन साध्या पद्धतीने विवाह करा असा आग्रह त्यांनी केला मात्र आम्ही आमचा निर्णय कायम ठेवला आणि नोंदणी पद्धतीने विवाह केला. यासाठी नोंदणी फी २१० रुपये, दोघांसाठी हार १०० रुपये असे मिळून ३१० रुपये खर्च आला. ‘

अनाठायी खर्च टाळा. यातुन आपली प्रगती करा –

लग्नामध्ये जवळपास किमान पाच ते सहा- लाख रुपये अनाठायी खर्च येतो. लग्नातील वाचलेल्या पैशातून भाग्यश्रीला मास्टर ऑफ आर्किटेक्चर किंवा एमटेकचे शिक्षण देणार असल्याची माहिती नवरदेव विशालने दिली आहे. तर लग्नातील नातेवाईकांच्या देणेघेणे, मानापानासाठी, जोरदार लग्न लावून देण्यासाठी कर्ज काढून, जमीन शेती विकली जाते. असा अनाठायी खर्च टाळा. यातुन आपली प्रगती करा असा संदेश नवरी भाग्यश्रीने दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ