Pune : ससाणेनगरमध्ये सामान्यांसाठी सुरू केली 20 रुपयांत OPD – स्मिता गायकवाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे कष्टकऱ्यांसह सामान्य नागरिक बेरोजगार झाला आहे. हाताला काम नाही, तर दाम नाही, अशी अवस्था त्यांची झाली आहे. त्यामुळे हॉस्पिटलचा खर्च कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे. त्यांच्या मदतीसाठी ससाणे नगर येथे फक्त 20/- हॉस्पिटल /ओपीडी सुरू केली असून, ही ओपीडी त्यांना आधार ठरत आहे, असे मत स्मित फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले.

स्मितसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा स्मिता गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हडपसरमधील (ससाणेनगर) स्मितसेवा फाउंडेशनच्या वतीने आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुष काढाचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी संतोष शिंदे, राजेश कांबळे, अशोक सोरगावीकर, अमोल भोंगळे, विजय नायर, संगीता पाटील, अर्चना बाजारमठ, संगीता बोराटे, अर्चना काटे, नूतन पासलकर, शीतल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी हडपसर आणि ससानेनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सफाई कामगार, सिक्युरीटी गार्ड, भाजीवाले, रिक्षाचालक, फेरीवाले यांच्यासह 250 नागरिकांनी आयुष काढाचा लाभ घेतला. तसेच यावेळी १०० नागरिकांना 3 महिने पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

स्मिता गायकवाड म्हणाल्या की, महिलांना संकटकाळामध्ये आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून हॅन्ड वॉश व फिनेल बनविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच रोजगार मेळावा घेऊन त्या माध्यमातून बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळवून देण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.