Pune Organ Smuggling Case | पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणानंतर अवयव प्रत्यारोपणाला ब्रेक ? कारवाईच्या भीतीने रुग्णालयांकडून टाळाटाळ, डॉक्टरांमध्ये कारवाईची भीती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Organ Smuggling Case | पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic Pune) किडनी तस्करीचा (Pune Kidney Smuggling Racket Case) प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यात अवयव प्रत्यारोपणाला (Organ Transplantation) ब्रेक लागतोय की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. कारण प्रत्यारोपणासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे (Directorate of Medical Education and Research) एप्रिलनंतर एकाही प्रकरणाची नोंद झालेली नाही. (Ruby Hall Clinic kidney transplant case)

 

पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणानंतर (Pune Organ Smuggling Case) डॉक्टरांमध्ये कारवाईची भीती आहे. त्यामुळे प्रत्यारोपणाच्या केसेस घेण्यास राज्यातील रुग्णालयांकडून टाळाटाळ केली जात आसल्याचे पहायला मिळत आहे. किडनी, हृदय (Heart), आतडे, फुफ्फुस (Lungs) प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना या प्रकरणामुळे फटका बसला आहे.

डॉक्टरांवर झालेल्या अन्यायकारक गंभीर कारवायांमुळे शस्त्रक्रिया थांबलेल्या आहेत. असंख्य रुग्ण जे प्राण वाचवणाऱ्या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचे जीव टांगणीला लागले आहेत. समाजावर आरोग्यविषक अन्याय होत आहे. अशा कारवायांमुळे सर्व डॉक्टर आणि रुग्णालय या प्रकारच्या शस्त्रक्रिया करायच्या का थांबवायच्या या गंभीर विचारात पडले आहेत. या प्रकरणामध्ये डॉक्टरांवर केलेले आरोपपत्र (Chargesheet) त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेने (Indian Medical Association Pune Branch) केली आहे.

 

काही दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता.
सारिका सुतार (Sarika Sutar) या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती.
या शस्त्रक्रियेनंतर महिलेला ठरलेली रक्कम देण्यास नकार दिला.
त्यानंतर महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) या प्रकरणाची तक्रार दिली.
या तक्रारीवरुन रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेझ ग्रँट (Managing Trustee Dr. Pervez Grant) यांच्यासह 15 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला.
आरोग्य विभागाने यापूर्वीच कारवाई करत रुबी हॉल क्लिनिकचा प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता.

 

 

 

Web Title :- Pune Organ Smuggling Case | Ruby Hall Clinic kidney transplant case Organ transplant break after kidney smuggling case in Pune Avoidance of hospitals for fear of action fear of action among doctors

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा