Pune News | आपलाच नेता पॉवरफुल, पुण्यात राष्ट्रवादी-भाजपची पोस्टरबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे महानगरपालिकांच्या निवडणुका (Pune Corporation election) येत्या सहा महिन्यात होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील (Pune News) प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकास कामावरून पोस्टरबाजी (poster campaign) करत त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. पुण्यात (Pune News) सध्या भाजप-राष्ट्रवादी (BJP-NCP) यांची पोस्टबाजी पहायला मिळत आहे. येत्या 22 जुलै रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजप-राष्ट्रवादी यांच्यात जोरदार पोस्टरबाजी सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. याच माध्यमातून दोन्ही पक्षांकडून आपला नेता किती पावरफूल आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भाजप-राष्ट्रवादीच्या होर्डिंगची चर्चा
पुण्यात एखादं होर्डिंग लागलं तर त्याची चर्चा होतेच. कालच मनसेने (MNS) पुणे महापालिकेला श्रद्धांजली वाहणारे होर्डिंग लावले होते. यावरुन खूप चर्चा झाली. आता राष्ट्रवादी आणि भाजपने लावलेल्या होर्डिंगची चर्चा जोरात सुरु आहे. राष्ट्रवादी आणि भाजपने शहरातील प्रत्येत प्रमुख चौकांमध्ये पोस्टर लावले आहेत. राष्ट्रवादीने अजित पवारांचा (Ajit Pawar) तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेले भलेमोठे होर्डिंग लावले आहेत.

कारभारी लय भारी
भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो असलेल्या होर्डिंगवर ‘नव्या पुण्याच्या विकासाचे शिल्पकार’ अशी टॅगलाईन दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या वाढदिवसाचे कॅम्पेन केले आहे. त्याची टॅगलाईन ‘कारभारी लय भारी’ अशी दिली आहे.

Web Title :- Pune | Our leader is powerful in pune ncp bjp poster campaign

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raj Kundra Arrested | अश्लिल चित्रपट प्रकाशित प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

Porn apps Case | पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी राज कुंद्रा आधी ‘या’ अभिनेत्रीला झाली होती अटक

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही