सातारा जिल्ह्यातील पाडेगावमध्ये एकाच वेळी 62 ऊसतोड मजुरांच्या मुलांची ‘वाजत गाजत’ शाळेत ‘एन्ट्री’

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) – राज्यातील विविध भागातून ऊसतोडणी हंगामात पाडेगांंव परिसरात येणाऱ्या स्थलांतरित मजुरांची संख्या मोठी असते. या ऊस तोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आशा प्रकल्पाच्या माध्यमातून एकाचवेळी बासष्ट मुलांचा शाळा प्रवेश पाडेगांंव (ता. फलटण) येथील शाळेत ढोल ताशाच्या गजरात मोठ्या जल्लोषात करण्यात आला.

सोमेश्वर कारखान्यावर आशा प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केला जात आहे. परंतु राज्यामध्ये सर्व ठिकाणी या प्रश्नास वाचा फोडण्याकरिता शिक्षण हक्क कायद्याची जनजागृती होणे महत्त्वाचे आहे याबाबत ऊसतोड व स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडणार व त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या करिता प्रयत्न करणार असल्याचे मत फलटणचे आमदार दिपक चव्हाण यांनी व्यक्त केले

ऊसतोड कामगार हे आपल्या अर्थकारणांशी जोडलेला अविभाज्य घटक आहे. ऊसतोड कामगारांच्यामुळे आपल्या भागात आर्थिक सुबत्ता येत आहे. सामाजिक जाणीवेतून आशा प्रकल्प काम करत आहे परंतु आपण ही काही देणं लागतो. त्या करिता “शाळा बाह्य मुक्त गाव” करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पाडेगांव फार्मच्या सरपंच स्मिताताई खरात यांनी केले.

तसेच या मुलांना प्रेमाची व आपुलकीची वागणूक दिली जावी अशी अपेक्षा पंचायत समिती सदस्या रेखाताई खरात यांनी व्यक्त केली. टाटा ट्रस्टचे परेश जयश्री मनोहर यांनी मुलांच्या शिक्षण हक्क व न्याय हक्काची लढाई असल्याने मुलांचे बालपण उसाच्या फडात, वीट भट्टीवर, दगडखानी मध्ये जाऊ नये याकरिता शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्टस – मुंबई व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्रश्नावर अभ्यास करून शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावे याकरिता डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्ड प्रोजेक्ट, आमचा शिक्षण हक्क आमचा अधिकार (आशा) प्रकल्प कार्यन्वित असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास फलटणचे आमदार दिपक चव्हाण, पंचायत समिती सभापती प्रतिभाताई धुमाळ, कार्यक्रम अधिकारी टाटा ट्रस्टस मुंबई परेश जयश्री मनोहर, फलटणचे गट शिक्षणाधिकारी रमेश गंभरे, भारत ज्ञान विज्ञानसमुदाय राष्ट्रीय उपाध्यक्ष आशा मिश्रा, चित्रकार-लेखक मनोज कुलकर्णी, आशा प्रकल्प प्रमुख संतोष शेंडकर, नवनाथ चोरमले, अनिल चाचर, मुख्याध्यापक पांडुरंग खताळ, भरत अहिवळे, नितीन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांच्या शालेय साहित्यकरिता ग्रामपंचायत पाडेगाव, वृषाली कौल, पुनम जैन, राजेंद्र बरकडे, राजेश खरात, पांडुरंग खताळ, शंकर खताळ यांनी पुढाकार घेतला. सुत्रसंचलन बिपीन मोहिते यांनी केले तर आभार उपसरपंच वैशाली भुजबळ यांनी मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/